लोहा| राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवबांना जे संस्कार दिले. राष्ट्रभक्ती दिली. अन्याया विरुध्द लढण्याची प्रेरणा दिली त्यातूनच रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. आज जिजाऊंच्या संस्काराची आजच्या पिढीला गरज असून त्याचा अंगिकार करावा असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते बालाजी गवाले यांनी केले:
लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयात सावित्री ते जिजाऊ या महोत्सवा निमित आयोजित व्याख्यानाचे पहिले पुष्प व्याख्याते बालाजी गवाले यांनी गुंफले.

संस्थापक वसंतराव पवार यांच्या संकल्पनेतून व कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या शिवछत्रपती विद्यालयात जिजाऊ जयंती निमित १२ जानेवारी रोजी शहरातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या तैलचित्रास भव्य शोभा यात्रा काढण्यात येत आहे . याच महोत्सवा अंतर्गत पहिले पुष्प व्याख्याने बालाजी गवाले यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दामोधर वडजे होते. प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी तर संचलन आर. आर. पिठ्‌ठ्ठलवाड यांनी केले.

व्याख्याते बालाजी गवाले यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच् कार्याचा गौरव करताना आजच्या सामाजिक व्यवस्थेवर प्रकाश टाकला. दैनंदिन जीवनातील सोदाहरणे देताना आज समाजात राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्काराची, त्यांच्या शिकवणूकीची कशी गरज आहे हे सांगितले, ‘लेक वाचवा’ – लेक शिकवा ” असा संदेश स्वरचित गीत सादर करून दिला. हसत-खेळत विद्यार्थ्यांना त्यांनी पाऊणतास’ मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी जिजाऊ जयंती निमिताने आयोजित विविध शालेय उपक्रम, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमा विषयी माहिती दिली. आभार एच. जी पवार यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक – कर्मचारी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version