हिमायतनगर, दत्ता शिराणे| राष्ट्रीय महामार्गावरील सरसम गावाजवळ वाळू वाहतूक दार टॅकटर व क्रुझर जीप गाडीची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत क्रुझर जीप गाडीचा चालक हा जागीच ठार झाला आहे. अपघाताची भिषणता एवढी मोठी होती की, मयताचे मुंडके तुटून बाजूला पडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगीतले. हि घटना बुधवार ता. २३ रात्रीच्या सुमारास घडली आहे.

हिमायतनगर तालुक्यांच्या सिमारेषेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या एका ही पेंडाचा लिलाव झालेला नाही. प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे जवळपास सर्वच वाळूच्या पेंडाचा लिलाव रखडलेला आहे. या संधीचा फायदा घेत वाळू चोर सक्रिय झाले आहेत. दरम्यान एक वाळूचे टॅकटर वाळू भरून भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गावरून सरसमकडे जात होते, तर भोकरकडून शिवनी येथील क्रुझर जीप गाडी एम. एच. २६ बी. क्यू. ३५३१ सोडभाडे करून गावाकडे परतत होती.

दरम्यान म्हसोबा नाल्या जवळ नंबर नसलेल्या सोनालीका कंपनीच्या टॅकटर ने भरधाव वेगात येवून क्रुझर जीप गाडीला जबर धडक दिली. या गंभीर अपघातात क्रुझर जीप गाडीचा चालक दिपक दामोधर कटकेमोड वय ३५ वर्ष रा. शिवनी ता. किनवट जि. नांदेड हा जागीच ठार झाला आहे. हा अपघात एवढा भिषण घडला की, मयताचे मुंडके तुटून बाजूला पडले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनीने सांगीतले. हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.

हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पैनगंगेतून प्रचंडप्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात येत असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू तस्कर चोरटी वाहतूक करतात. महसूल प्रशासनाच्या कचखाऊ वृत्तीमुळेच वाळू चोर स्वैर झाले असून, झालेला अपघात केवळ प्रशासनाकडुन वाळू चोराला अभय मिळत असल्यामुळेच झाला. असा आरोप सुजाण करीत असून वाळू चोराचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी ही आता या निमित्ताने  पुढे आली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version