श्रीक्षेत्र माहूर | शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा दि.30/07/25 रोजी वसंतराव नाईक सभागृह पंचायत समीती माहूर येथे मा.शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड दिलीप कुमार बनसोडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
दिलीपकुमार बनसोडे यांच्या मार्गदर्शनात इयत्ता 6वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनाना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व माध्यमातील जि.प.व खाजगी माध्यमिक मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व विषय तज्ञ यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थी लाभाच्या योजना सर्व स्तरांतून परिणामकारकपणे राबविण्यात याव्यात व त्यापासून कुणी वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी जागरुक राहून कार्य करावे असे आवाहन कार्यशाळेचे अध्यक्ष दिलीपकुमार बनसोडे यांनी केले.तसेच दुर्गम-डोंगरी-अदिवासी भागातील विद्यार्थी वर्गासाठी स्वतःला झोकून द्यावं लागेल तसेच या समाजाचं आपण सर्वांना देणं लागतं ते आपल्या कार्यातून आपण पूर्णत्वास न्यावं असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेस यावेळी संतोष शेटकार गटशिक्षणाधिकारी, माधवराव शिंगडे उपशिक्षणाधिकारी योजना,संग्राम कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी करंजी बीट,वानोळा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी बिरमवार , गटसमन्वयक संजय कांबळे,रुस्तम शेख, काशीनाथ थोंटे, शेषराव पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यांच्यासह सर्व माध्यमातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि साधनव्यक्ती गटसाधनकेंद्र माहूर हे उपस्थित होते.यावेळी माधवराव शिंगडे उपशिक्षणाधिकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्या तसेच रुस्तुम शेख यांनी विविध लाभाच्या शासनाच्या योजनांच्या संदर्भात माहीती देताना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माहुरचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी आभार मानले व सर्वांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.