श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| कुरेशी समाज हा परंपरेने मांस विक्री, कत्तलखाने आणि जनावरांच्या व्यवहाराशी संबंधित व्यवसायात असलेला घटक असून, गेल्या काही काळात त्यांच्या व्यवसायासंदर्भात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जमीयतुल कुरेश, माहूर यांच्या वतीने एक सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाला सादर करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे कुरेशी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या माहूरमध्ये कायमस्वरूपी, आधुनिक सुविधांनी युक्त असा कत्तलखाना उपलब्ध नसल्याने जनावरांची वाहतूक रस्त्यावरून करावी लागत आहे. यामुळे अनेकदा गैरसमज, अडवणूक, पोलिसी हस्तक्षेप यांचा समाजाला सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर शहरातच एक नियमित व मान्यताप्राप्त स्लॉटर हाऊस उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.जनावरांची खरेदी-विक्री करताना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे व वैद्यकीय तपासणीची सुविधा पुरेशी उपलब्ध नसल्याने समाजाला अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात.काही पोलीस अधिकारी जनावरांची वाहतूक करणाऱ्या समाजबांधवांना विनाकारण अडवतात.
काही वेळा कायदेशीर कागदपत्र असूनही गाड्या जप्त केल्या जातात. ही अडवणूक थांबवून कायद्याचे पालन करणाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गोमांस प्रकरणात गैरसमज दूर करावेत जनावरांच्या चोरीच्या खोट्या आरोपांचा बंदोबस्त करावा .या सर्व मागण्या मान्य करून समाजाच्या व्यवसायासंबंधी निर्माण झालेल्या अडचणी दूर कराव्यात, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, शासन दरबारी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष फ़िरोज़ कादर दोसानी माजी सभापती हाजी उस्मान साहब, रामु हरिशचन्द्र जाधव, संजय किशन गायकवाड, हाजी अब्दुल रऊफ सौदागर, रफीक सौदागर, मुनाफ भाई, सफराज दोसानी सय्यद रहमत अली इलियास बावाणी अजीस भाई इरफ़ान सय्यद निसार कुरैशी, रफ़ीक़ सौदागर शैख़ सज्जाद सय्यद अज़ीम सईद अली वसीम कुरेशि अतीक कुरेशी समद सौदगर, बाबु कुरेशी इब्राहिम कुरेशी शेख फरिद कुरेशी, कदिर कुरेशी शेख फारुक कुरेशी सलीम कुरेशी, मोहिद्दिन कुरेशी, जाविद कुरेशी, वली पाशा कुरेशी, रफिक कुरेशी, मनान कुरेशी, सरवर कुरेशी, अहेमद साहब कुरेशी, सत्तार कुरेशी, रज्जाक कुरेशी, इस्माइल कुरेशी, मोहसीन कुरेशी, गनी कुरेशी, तौसिफ कुरेशी, इक्बाल कुरेशी, सादिक कुरेशी, वाजिद कुरेशी, बब्लु मुख्तार कुरेशी, जाविद कुरेशी, सोहेल कुरेशी, हमीद कुरेशी, जहोर कुरेशी, यांचे सहसेकडून बांधव उपस्थित होते.