हिमायतनगर | तालुक्यात येणारे मौजे टेंभी हे गाव “आदर्श गाव” म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या गावात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, महिलांचे आणि ज्येष्ठांचे जीवन असुरक्षित बनले आहे. हि बाब लक्षात घेता गावातील अवैदय दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दिनांक १५ ऑगस्ट पासून संपूर्ण महिला पुरुष गावकरी अमरण उपोषण करणार आहेत असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून देत गोविंद कदम यांनी थेट पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, टेंभी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उधवस्त होत आहेत. गावात दारू विकण्याचा कसल्याही प्रकारचा कादेशीर परवाना त्यांचा जवळ नसताना बे-कायदेशीर मार्गाने सर्रासपने देशी व विदेशी दारू, केमिकल युक्त रासायनिक दारू, मोठ्या प्रमाणात चालू आहे. यास गावातील तरुण मोठ्या प्रमाणात बळी पडत असून, अनेकांचे संसार उधवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारूच्या नसेत अनेक तरुण आत्म-हत्या करत आहेत. आई वडिलांना मारहाण करत आहेत सायंकाळी दारूच्या नसेत वाद-विवाद होत आहेत. गावातील लोक प्रतीधींना आरेरावी करत शिवीगाळ करत आहेत.
सदरील गावात माननीय जिल्हा अधिकारी साहेब नांदेड यांच्या समक्ष गावकरी महिलांनी अवैद्य दारू विक्री विषयी माहिती दिली असता साहेबानी दखल घेऊन पोलीस अधिकारी पाठवले होते. त्यामुळे काही दिवस दारू बंद असल्याचे पाहावया मिळाले. मात्र पुन्हा अवैद्य दारू विक्रीने तोंडवर काडले असून, मागचीच परस्थिती निर्माण झाली आहे. सदरील गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगे महाराज हे गावात आले होते. त्यांचा विचाराचा संस्कारावर गावात सर्वजाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने निर्व्यसनी होऊन राहत होते. आजही गावात सामुदाईक प्रार्थना व सामुदाईक ध्यान असे धार्मिक कार्यक्रम चालतात राष्ट्रसंताच्या ग्रामगीते प्रमाणे तुकडोजी महाराज ग्रामगीते मध्ये लिहेतात.
दारू, गांजा, भांग, अफिम ! जुगार वेशादी वाईट काम ! याचे उरून द्यावे नाम ! आपुल्या गावी || या ओवी प्रमाणे गावात कार्य चालू राहावे व गाव वें मुक्त व्हावे अशी राष्ट्र संतांची इच्छा होती. परंतू ते आज पाहायला दिसत नाही हे कार्य गावात सदोदित चालावे व गाव नंदनवन व्हावे या माध्यमातून विचार मिळाले आहेत. सदरील गावात सुख शांती समृद्धी व शांतता कायम ठेवण्यासाठी अवैद्य दारू विक्री करणाऱ्या लोकांना तात्काळ बंदोबस्त करून त्यांना हद्दपार करण्यात यावे अशी मागणी पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय पोलीस अधीक्षक भोकर यांच्यासह संबंधिताना देण्यात आले आहे. तात्काळ गावातील दारू विक्री बंद झाली नाहीतर गावातील अवैदय दारू विक्री बंद करण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.