हिमायतनगर| बुधवारी शहरातील आठवडी बाजार च्या गर्दीची संधी साधून चोरट्यांनी अनेक बाजार करणाऱ्यांना नागरीकांच्या खिशातील मोबाईल वर डल्ला मारत आयफोन सारखे जवळपास दिड लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले असल्याने बाजार करू घाबरले असुन जवळपास दहा ते पंधरा लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असुन दिवसा ढवळ्या चोरट्यांनी मोबाईल लंपास केले असल्यामुळे पोलीस प्रशासनाची यंत्रणा थंड कशी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हिमायतनगर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते आंबेडकर चौक, ग्रामीण रुग्णालय, चौपाटी लकडोबा चौक यासह अन्य परिसरात विस्तार असुन ग्रामीण भागातील नागरिक बुधवारी बाजार करण्यासाठी मोठी गर्दी होते.या आठवडी बाजार चा फायदा घेत अनेकदा चोरट्यांनी मोबाईल चोरल्याच्या घटना घडल्या असल्या तरी बाजार दिवशी पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित नाही.

दि.6 आगस्ट रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान बाजार करण्यात गुंग असलेल्या नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.एक नाहीतर दहा ते पंधरा नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती आहे.पाच ते सहा नागरीकांनी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली असुन काही नागरीकानी स्वत शोध घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु जवळपास दोन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेले असल्याने दिवसा ढवळ्या मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ असल्याने पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.शहरात गेल्या अनेक वर्षांपासून चोरीच्या घटना थांबल्या असल्या तरी दिवसा ढवळ्या मोबाईल चोरटे कसे बाजारात शिरले याचा शोध पोलीस घेणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version