श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावाणी| माहूर तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी केलेली धूळपेरणी आणि विहिरीच्या पाण्याच्या भरोशावर केलेली पेरणी वाया गेल्याने मध्यंतरी दोन वेळा चांगला पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा चौथ्यांदा पेरण्या केल्या त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने चौथ्या वेळी केलेल्या पेरण्या ही वाया गेल्या.

यानंतर मात्र परंतु महिनाभरापासून पडत असलेल्या सततच्या पावसाने तसेच सौर ऊर्जा न मिळाल्याने पीकांची वाढ खुंटली तर पाचव्यांदा पेरणी करण्यासाठी पावसाने उघडीप दिलीच नाही त्यामुळे शेकडो एकर जमीन पडीक आहे परिणामी शेतकरी पूर्णपणे हवालदिल होऊन कर्जबाजारी झाला आहे तालुकातील शेतकरी अवैध सावकाराच्या जाळ्यात अडकण्याआधी शासनाने तात्काळ चिबडलेल्या पेरणी न केलेल्या शेतांचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रुपी अनुदान खात्यात जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे

माहूर तालुक्यात 34 हजार 400 हेक्टर जमीन असून हजारो हेक्टर जमीन पडीक आहे उंच सखल डोंगरदऱ्याचा भाग असल्याने शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून काहीच फायदा नाही या ठिकाणी जमीन भरकाड असल्याने विहिरी बनवता येत नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या जमिनी पडीक ठेवून मूलमजुरीवर जीवन जगत आहेत जवळपास दहा हजार विहिरी बनूनही पाणी नसल्याने विहिरीच्या भरोशावर जमीन ओलीत करता येत नाहीत परंतु काही शेतकऱ्यांनी निसर्गावर भरोसा ठेवून पेरण्या केल्या परंतु त्यां न साधल्याने शेतकऱ्यांचे विक्रमी नुकसान झालेले आहे

अनेक शेतकऱ्यांनी मित्रत्वाखातर दलालाकडून तसेच भरवशाच्या कृषी केंद्राकडून बियाणे विकत घेऊन पेरण्या केल्या ते बियाणे उगवलेच नाही त्यामुळे अनेक ठिकाणी तक्रारी झाल्या भरकाड जमिनीवर बोगस बियाणे बोगस खते वापरल्याने जमिनीची पोत बिघडली दुबार तिबार केलेल्या पेरण्या वाया गेल्या कर्ज रिन्यूअल झाल्याने रूपया हाती आला नाही शासन दरबारी सिविल खराब होऊ नये म्हणून केलेली खटाटोप अंगलट आल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना अवैध सावकाराच्या जाळ्यात अडकावे लागले आहे शासनकर्ते अधिकाऱ्यांना सर्व बाबी माहीत राहूनही थातूरमातूर पंचनामे करून वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांचे वाटोळे करण्यात अधिकाऱ्यांचा जास्त हात असल्याने शेतकऱ्यातून शासनाप्रर्ती नाराजी व्यक्त होत आहे.

अनेक दिवसापासून सर्व छोट्या-मोठ्या पक्षाकडून आंदोलने उपोषण बसवून कर्जमाफीची मागणी होत असताना लाडक्या बहिणीचा बहाना पुढे करत कर्जमाफी टाळत टाळली जात असल्याने शेतकरी दिवसेन दिवस दहा ते पंधरा टक्क्यांनी कर्ज काढून शेतशिवार बहरावे या प्रयत्नात आहे. तहसीलदार मुगाजी काकडे हे खेड्यापाड्यात फिरत असून कृषी विभागाचे अधिकारी मात्र झोपेतच असल्याने सुदैवाने पैनगंगा नदीला पूर आला नसला तरी विहिरी तलाव शेततळे तुटुंब भरले आहेत.

माहूर तालुक्यात यावर्षी 474.05 मिलिमीटर पाऊस पडला असून वातावरण महिन्याभरापासून ढगाळ राहत असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतशिवार आजही काळेभोरच दिसत असून हितभर वाढलेल्या पिकांची झाडे पुढे काय उत्पन्न देतील याचा अंदाज लावून शेतकरी डोक्याला हात मारून घेत असताना बोगस बियाणे खते विकणारे मजेत सावकार आनंदात शेतकरी मृत्यूच्या खाईत अशी अवस्था माहूर तालुक्यातील शेतकर्यांची झालेली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ तालुक्यातील शेत जमिनीचा सर्वे करून चिबडलेल्या पिकांची वाढ खुंटलेल्या विहिरी ढासळल्याने नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना कर्जमाफी देत तत्काळ पेरण्या व नुकसान भरपाई पोटी अनुदान खात्यात जमा करावे अशी मागणी कर्जा पायी मृत्यूच्या खाईत लोटलेल्या सर्व शेतकऱ्यांतून होत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version