श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या पॅसेंजर ला बाजूच्या दुकानदाराने माझ्या दुकानासमोर लावलेली गाडी काढून घ्या असे म्हणले असता शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना दि रोजी 31 रोजी नऊ वाजून 30 मिनिटांनी घडल्याने लॉज मालकासह पॅसेंजर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी दिलीप जयस्वाल हे बस स्थानका समोरील जयस्वाल कॉम्प्लेक्स येथे बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड फ्रेन्चाईशी चालवुन कुटुंबाचे उदर्निवाह भागवितात त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात समक्ष हजर होऊन फिर्याद दिल्याप्रमाणे ते दि.31/07/2025 रोजी सकाळी 09.30 वा. चे सुमारास मी माझे ओम मोबाईल मॅजिक दुकान उघडत असतांना माझे दुकानासमोर चार चाकी पार्किंग केलेली दिसली असता मी राधिका लाँज व हॉटेल चे मालक प्रभु मेहता यांना मी माझे दुकान उघडत आहे दुकानासमोर लावलेली चार चाकी गाडी क्र MH-04-FR-0457 काढुन घ्या असे सांगितले असता प्रभु मेहता यांचे लॉजवर थांबलेला वैभव भगवान पठाडे राहणार पुसद यांनी त्यांची गाडी काढुन घेतली.
मी दुकानात असतांना माझ्याकडे येवुन मला शिवीगाळ करुन धक्काबुकी केली व माझ्या तोंडावर हाताने मारहाण करु लागला असता तेव्हा माझ्या दुकाना शेजारी राहणारे शेख सद्दाम शेख जब्बार वय 33 वर्षे जावेद खान अजीज खान पठाण वय 50 वर्षे दोघे रा. माहुर यांनी सदर भांडने सोडवा सोडवी केली. नंतर तुला बघुन घेतो असे, बोलुन वैभव भगवान पठाडे हा तेथुन निघुन गेला. भांडणामध्ये दुकानातील साहित्याची तोडफोड त्याने केली आहे. तसेच मी वारंवार राधिका लॉज व हॉटेलचे मालक प्रभु मेहता यांना माझ्या दुकानासमोर त्यांचे लॉजवर येणारे ग्राहकांचे वाहने पार्किंग करु नका असे सांगितले असता ते याकडे दुर्लक्ष करीत असुन आज रोजी मला त्यांनी माझे ग्राहक इथेच गाड्या लावतील असे म्हणुन शिवीगाळ केली आहे.
राधिका लॉज मध्ये आलेले पॅसेंजर वैभव भगवान पठाडे वय 30 वर्ष व्यवसाय चालक रा. साई विहार कवडीपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ व राधिका लॉज व हॉटेलचे मालक प्रभु मेहता रा. माहुर जि. नांदेड या दोघांविरूध्द कायदेशिर कार्यवाही करावी अशी फिर्याद दिलीप जयस्वाल दिल्याने माहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे मार्गदर्शनाखाली स पो नी संदीप अन्येबोईनवाड आणि पोलीस करत आहेत.
माहूर शहर देवस्थानाचे ठिकाण असल्याने येथे शंभराच्या जवळपास लॉजिंग आणि घरगुती लॉजिंग चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने येथे दररोज शेकडो वाहने येत असून ही वाहने थांबविण्यासाठी एकाही लाज गेस्ट हाऊस मालकाने पार्किंग साठी जागा सोडलेली नसल्याने सर्व वाहने इतर दुकानदारांच्या दुकाना समोर किंवा मुख्य रस्त्यावर थांबत असल्याने माहूर शहरात वाद निर्माण होत असल्याने संबंधित विभागाने लाजमालकांना पार्किंग साठी जागा सोडूनच इमारत बांधकाम करावे अशी ताकीद द्यावी अशी मागणी नागरिकांतून वाहनधारकातून होत आहे.