श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर शहरात रुजू झाल्यापासून एकापाठोपाठ ताबडतोब गुन्हेगारावर कारवाया करीत असून अवैध रित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यावर माहिती मिळताच धाडी टाकून कार्यवाही करत असल्याने शहरातील बौद्ध पुरा परिसरात घराच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेऊन 15500 रुपयांच्या जुगार खेळण्याच्या साहित्यसह मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि 28 रोजी दुपारी 5.30 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे.
नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तसेच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या अवैध व्यवसाया विरुद्ध मोहिमेची काटेकोर पुणे अंमलबजावणी तसेच इतर अवैध धंद्याविरुद्ध खुल्या मोहीम सुरू करून अवैध व्यवसाय करणाऱ्यात खळबळ उडवलेली असताना काही मुजोर माफियाकडून आवाज रित्या दारू विक्री सुरू होती त्यामुळे ठिकाणी धाडी टाकून त्यांचा माज उतरवत असताना अवैधरित्या जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने आठवडाभरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी पालसिंग ब्राह्मण सपोनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका गजानन चौधरी पोहेका प्रकाश गेडाम पोहेका कैलास जाधव पवन राऊत ज्ञानेश्वर खंदाडे चालक जाधव यांनी कामगिरी बजावली.