नांदेड| विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे बसस्थानकात शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पुस्तिका व आपत्ती व्यवस्थापनाचे कॅलेंडर प्रवाश्यांना विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या हस्ते वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्य परिवहन महामंडळ नांदेड बसस्थानका मध्ये प्रवासी व नागरिक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवना वरील सारांश अशा विविध पुस्तकाद्वारे संपूर्ण शिवचरित्रातील भाग तसेच शिवचरित्र या व अशा विविध पुस्तकांचे वाटप महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच आपत्ती व्यवस्थापन संबंधी समाज प्रबोधन उपयोगी प्रचार व प्रसार होण्यासाठी आपत्तीमध्ये आपण काय करावे व तसेच आपत्तीचे प्रकार व उपाय त्यात शीतलहर, थंडीची लाट, चक्रीवादळ, गारपीट, आग आणि आकस्मित आग, दुष्काळ, अतिवृष्टी व ढगफुटी, दरड कोसळणे, पूर, रस्ते अपघात, भूकंप, सर्पदंश, वीज चमकणे पडणे, अशी समाज उपयोगी उपयुक्त माहिती मार्गदर्शिका प्रवासी यांना नांदेडकर यांच्या हस्ते देण्यात आल्या. यापूर्वी पण त्यांनी खूप असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेली आहे.

तसेच पूर्ण बसस्थानकातील काँक्रीटिकरण जे झालेले आहे तो पाठपुरावा करण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे या भव्य कार्यक्रमांतर्गत महाराज्य राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेचे पदाधिकारी सहकार्य करतात. या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वासू प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सहसचिव रमाकांत घोणसीकर कोषाध्यक्ष बालाजीराव पवार, हे होते तर राज्य परिवहन महामंडळ अधिकारी/ कर्मचारी दिनेश ठाकूर, बालाजी शिंदे , एन डी पवार, अतिष तोटावार , तसेच प्रवासी तथा नागरिक उपस्थित होते

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version