नांदेड| जेसीबीच्या धडकेत सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रेमानंद तलवारे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर डॉ. बंडेवार हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांचे लहान बंधू जिल्हा परिषद येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रेमानंद विठ्ठलराव तलवारे यांना काल दि. २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी नित्याप्रमाणे सकाळी वजिराबाद, नांदेड स्थीत येथे जिमसाठी जात असताना त्यांच्या हिरोहोंडा स्प्लेंडर चक -१४-ॠन-३३८१ या वाहनास सिडको- लातूर फाटा दरम्यान हिरोहोंडा शोरुम जवळ भरधाव वेगाने येणार्‍या विना नंबर प्लेटच्या जेसीबीने समांतर जात असलेल्या प्रेमानंद तलवारे यांच्या गाडीस उजव्या बाजूने धडक दिल्यामुळे प्रेमानंद तलवारे जखमी झालेत.

त्यांना बोरबन नांदेड येथील डॉ. विजय बंडेवार यांच्या हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, सदर नंबर प्लेट नसलेल्या जेसीबीचे चालक लक्ष्मण चव्हाण व जेसीबी मालक भिमराव लोंढे असल्याचे जेसीबीचे मॅनेजर संदिप शिंदे यांनी जखमींच्या नातेवाईकांना सांगितले आहे. सदर जेसीबी निष्काळजीपणे चालविणार्‍या चालक आणि मालकावर कार्यवाही करावी अशी तलवारे कुटुंबायाची मागणी आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version