नांदेड। संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता हीच सेवा’ हे दैंनदिन उपक्रमांना गती देण्याकरिता ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामाजिक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्यांच्या कामापासून अनेकांनी स्वच्छतेची प्रेरणा घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या अभियानाचा एक भाग म्हणून दि. १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत एक तारीख एक तास हा स्वच्छता श्रमदान उपक्रम जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. यावेळी चिमुकल्यांसह जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, धनराज गोडबोले, हैदर शेख, मनिषा गच्चे, बालाजी पांचाळ यांची उपस्थिती होती.

‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालय व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाबरोबरच १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत जवळा देशमुख येथील जि.प. शाळा आणि ग्राम पंचायत कार्यालयात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांच्या व ग्रामसेवक गजानन कोंडामंगले यांच्या मार्गदर्शनाखाली ”स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये सुरु असणाऱ्या या अंतर्गत जवळा देशमुख येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छता हीच सेवा हा पंधरवडा साजरा करण्यात आला. याचा २ आॅक्टोबर रोजी समारोप करण्यात आला आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version