नांदेड।राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने गुरुनानक जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड येथे येणाऱ्या भाविकांसाठी आपली सेवा प्रदान करण्याचे ठरविले असून हा एक दिवसीय उपक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे .

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य २५ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करीत असून याचाच भाग म्हणून राज्यात प्रत्येक जिल्हास्तरावर शासन सेवेत सदर अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत .

गुरुनानक जयंती निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असून सुद्धा सदर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी वर्ग सुट्टीचा दिवसही समाज उपयोगी आंदोलन व्हावे हा दृष्टिकोन विचारात ठेवून शिख बांधवांची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी , पर्यवेक्षक , नर्सेस , आरोग्य खात्यातील कर्मचारी संप काळातील एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन सेवा प्रदान करणार आहेत .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version