नांदेड | पवित्र ईद-उल-अजहा (बकरी ईद) नांदेड शहरात उत्साह, शांतता आणि धार्मिक वातावरणात मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ईदची नमाज सकाळी ठीक 8 वाजता पाकीजा नगर, देगलूर नाका येथील ईदगाह मैदानावर शांततेच्या वातावरणात अदा करण्यात आली. हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली.

मुफ्ती खलीलुर्रहमान साहेबांनी हजरत इब्राहीम (अ.स.) यांच्या बलिदानाची महती सांगितली. त्यांनी नमूद केलं की, “आजच्या तरुण पिढीमध्ये धर्मापासून दुराव्याचं प्रमाण वाढत आहे. नमाज, कुरआन यापासून दूर जाऊन भोगवादाकडे वळल्यामुळे दुःख, संकटं, अपमान आणि अडचणी येत आहेत. तरुणांनी धर्माशी नाळ घट्ट जोडणं ही काळाची गरज आहे.”

त्यानंतर काझी झुबैर साहेबांनी पारंपरिक अरेबी भाषेत खुतबा (प्रवचन) दिलं. मौलाना साद अब्दुल्ला साहेबांनी नमाज अदा केली आणि त्यानंतर विशेष दुआ करण्यात आली. या दुआत संपूर्ण जगात शांतता, एकोपा आणि स्थैर्य, फिलिस्तीनमधील पीडित मुस्लिम बांधवांसाठी, तसेच आपल्या देशात सौहार्द व भाऊचाऱ्याचं वातावरण टिकून राहावं, आजारी व्यक्तींच्या आरोग्यासाठी, दिवंगत आत्म्यांसाठी, अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी आणि विवाहाच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुण-तरुणींसाठी प्रार्थना करण्यात आली.

दुआ संपल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ‘ईद मुबारक’ च्या शुभेच्छा दिल्या. या भावनिक आणि आनंदाच्या क्षणी बंधुत्वाचा खरा अर्थ दिसून आला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि सलोख्यात पार पडला. शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासन व आयोजकांचे आभार मानले आणि धर्म, सामाजिक सलोखा व सहिष्णुतेचा आदर्श घालून दिला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version