नांदेड| वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व अन्य माध्यमातून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये व निरपेक्ष वातावरणात निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी माध्यमांची देखरेख व सनियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाने एमसीएमसी (माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती ) समिती जिल्हयासाठी गठीत करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष अथवा उमेदवारांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातील जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख (एमसीएमसी) समिती गठीत करण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत हे आहेत. तर सदस्य म्हणून सहा. 87-नांदेड दक्षिण वि.म.संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल कर्णेवार, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद बाबुराव दळवी, पत्र सूचना कार्यालयाचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे, दै. लोकमतचे आवृत्ती संपादक राजेश निस्ताने काम करतील. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके हे काम पाहणार आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version