नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड आयोजित ग्रंथोत्सवाचे नियोजन पूर्वतयारी करीता शासनाने गठीत केलेल्या समितीची बैठक आज जिल्हा ग्रंथालयात घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन नांदेड येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन निश्चित करण्यात आले.

या बैठकीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे प्रतिनिधी रोहिदास बस्वदे, प्रकाशन संस्था यांचे प्रतिनिधी निर्मलकुमार सुर्यवंशी, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधरजी पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, सहसचिव संजय पाटील,साहित्यिक नारायण शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, संतोष इंगळे, कैलाशचंद्र गायकवाड व अजय वटटमवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय ग्रंथोत्सवात साहित्यिक, लेखक व विविध क्षेत्रातील वक्त्यांच्या संदर्भात चर्चा करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन ग्रंथोत्सवात सहकार्य करण्याबाबत विनंती केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version