हिमायतनगर। हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुतीकडुन खासदार हेमंतभाऊ पाटील यांना जाहिर झाल्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित दादा गट, महायुतीचे पदाधिकारी एकत्र येऊन आज हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा हेमंत भाऊ पाटील यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी करू असा संकल्प केला आहे.

बहुप्रतीक्षीत हिंगोली लोकसभेच्या जागेवर महायुती कडुन कोणाला उमेदवारी दिली जाईल यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उद्धान येत असतांनाच हि जागा भारतीय जनता पार्टीला कि शिवसेना शिंदे गटाला सुटेल हा संभ्रम जनतेत होता, अखेर दि. २८ गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नावाची हिंगोली लोकसभे करीता उमेदवारी जाहिर केल्याने, महायुतीतील प्रतिक्षेत असलेल्या जागेचा तीढा सुटला, त्यानंतर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरा समोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी जी.प.सदस्य सत्यवृत्त ढोले, भाजपा जिल्हा महामंत्री गजानन तुप्तेवार, भाजपा तालुका प्रमुख गजानन चायल, जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, उप. जि. प्र. राजु पाटील, युवा सेना उप जि.प्र. गौरव सुर्यवंशी, युवासेना ता. प्र ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, महिला आघाडी उप.ता.प्र. पुजा चव्हाण, महिला आघाडी श.प्र. रेणुकाताई साबळकर, श.प्र.गजानन हरडफकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस ता.प्र. अभिषेक लुटे, वसंतराव डवरे, बालाजी खोकले, रामदास भडंगे, शंकर वागतकर, भिमराव भिसे,

तसेच भाऊराव वानखेडे, सुनिल चव्हाण, विजय वळसे, गजानन गोपेवाड, संतोष साभळकर, शंकर भैरवाड, नागनाथ गुंडेवाड, परमेश्वर अग्रवाल, हिदायत खान, नृसिंग नाईक, संतोष शिरगिरे, दिलीप ढोणे, भाजपा शहर प्रमुख विपुल दंडेवाड, बालाजी राठोड, सितल सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, कल्याण ठाकुर, परमेश्वर नागेवाड, गजानन पिंपळे, बालाजी मंडलवाड, सुनील चव्हाण, प्रकाश सेवनकर, विशाल शिंदे, नागेश अंधारे. लक्ष्मण डांगे, मारोती मोरे, रूपेश भुसावळे, विनायक ढोणे, लक्ष्मण ढाणके, शुध्दोधन हनवते, दिनेश राठोड, अनिल माने, संतोष बनसोडे, शंकर चव्हाण, संतोष पाटील, यांचेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version