मुंबई/नांदेड। भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल समितीच्या वतीनेउत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर किरीट सोमैया ,महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार समिती अध्यक्ष राजकपूर बागडी ,आयोजक विशाल जाधव आधी व मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर किरीट सोमैया यांनी आलेल्या पुरस्कारांना क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती व महत्त्व आणि मार्गदर्शन केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम यांना खासदार डॉक्टर किरीट सोमैया यांच्या शुभहस्ते
मानपत्र व समानचिन्हं देऊन गौरव करण्यात आला.

मिनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट महाराष्ट्र खेळाचा प्रचार प्रसार व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य खेळ पुरस्कार 2023 चा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मिनाक्षी गिरी याना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल
भारतीय टेनिस क्रिकेट founder फाउंडर कन्हैया गुज्जर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे, , धनंजय लोखंडे ,संदिप पाटिल ,मानस पाटिल ,सिध्देश गुरव ,दर्शन थोरान ,ओमकार पवार , सुमित अणेराव, कुणाल हदळकर गणेश भालेराव यांनी यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version