नांदेड| पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून लोकशाही टिकवण्यासाठी आणि शोषित पीडित वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारा एक जबाबदार सामाजिक घटक आहे .मात्र पत्रकारांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे कारण त्यांच्यावर त्याचे कुटुंब विसंबून आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जंगमवाडी येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनात हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ,आरोग्य विभागाचे प्रमुख अजितपाल संधू महाराज ,महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेशसिंह बिसेन , आधीस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी , डॉक्टर बयुद्दीन, डॉक्टर राजेश तोष्णीवाल ,डॉक्टर अश्रफ कुरेशी , विभागीय संघटक प्रकाश कांबळे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष पांडागळे ,महानगर अध्यक्ष शिवराज बीच्चेवार , अधिस्वीकृती समितीचे सदस्य अमोल आंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष संतोष पांडगळे यांनी मानले.

महानगरपालिकेच्या पुढाकारातून जंगमवाडी येथील महापालिकेच्या दवाखान्यात पत्रकारांच्या आरोग्याबाबत आवश्यक असणाऱ्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सकाळी सात वाजल्यापासून महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी या तपासणी शिबिरासाठी परिश्रम घेत होते . रविवार असतानाही सुट्टीचा दिवस असताना महानगरपालिकेचे अधिकारी , कर्मचाऱ्यांनी पत्रकारांच्या आरोग्यासाठी या शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबिरात पत्रकारांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेचे हेमराज वाघमारे, प्रवीण पवार ,बालाजी चव्हाण मयूर पाटील , वीरभद्र तेलंग , ज्योती घेणे, माधव गजभारे ,सविता माटे ,दीक्षा पाटील, गंगाबाई सुरणे, मयुर पाटील, रेखा आगलावे ,रेखा नरवाडे ,वैशाली पाटील या आरोग्य परिचारिका, टेक्निशियन आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्यासह पत्रकार कृष्णा उमरीकर, रवींद्र संगणवार , राजू कोटलवार, प्रशांत गवळे आनंद कुलकर्णी किरण कुलकर्णी गजानन कानडे दीपक बाविस्कर , सुरेश काशिदे , कंथक सुर्यतळ, यशपाल भोसले, आजम शेख, इमरान खान, गौतम कदम, लक्ष्मण भवरे, यशवंत थोरात ,प्रमोद गजभारे ,रवींद्र कुलकर्णी, मौला भैया, सुरेश आंबटवार, पुरुषोत्तम जोशी, विजय बंडावर, कमलाकर बिरादार, भूषण परळकर , चंद्रकांत गव्हाणे, ज्ञानेश्वर सूनेगावकर, नरेंद्र गडप्पा, पुरुषोत्तम जोशी, गोविंद करवा, अमोल आंबेकर ,पंकज उबाळे आदींची उपस्थिती होती.

दरम्यान जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तरी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी ,डॉक्टर सुरेशसिंह बिसेन , आरोग्य विभागाचे प्रमुख अजितपालसिंग संधू यांची समायोचीतत भाषणे झाली . यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम म्हणाले की ,पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .खरे तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांचे वय चाळीस वर्षे झाले आहे त्या नागरिकांनी आणि पत्रकारांनी आपल्या आरोग्य संबंधित असणाऱ्या महत्त्वपूर्ण सगळ्या चाचण्या करून घ्याव्यात. दैनंदिन जीवनामध्ये योगासने करावीत. मॉर्निंग वॉक ,व्यायाम या गोष्टीला प्राधान्य द्यावे. आहार आणि विहार याकडे लक्ष द्यावे कारण आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण उत्तमपणे काम करू शकतो. अन्यथा आपल्या आरोग्याचा कामावर ,कुटुंबावर आणि पर्यायाने राष्ट्रावर ही परिणाम होतो..याची जाणीव ठेऊन प्रत्येक पत्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version