हिमायतनगर। तालुक्यातील बळीराम तांडा येथे गावातीलच काही जणांनी फिर्यादीच्या घरी दरोडा टाकून विनयभंग करीत सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुन अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. अशा आशयाची तक्रार पीडित महिला सौ. आडे, वय 21 वर्षे, व्यवसाय घरकाम, रा. बळीराम तांडा ता. हिमायतनगर जि.नांदेड यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात गावातील तिघांसह 10 ते 12 जणांवर गु.र.न. 204/2023 कलम 307,452,327,354,143, 147, 148, 149, 427,504,506 भा.द. वी. अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हिमायतनगर पोलीस ठाणे डायरीवरून मिळालेली सविस्तर अशी की, दि.07/10/2023 रोजी दुपारी अंदाजे 13:00 वाजताचे सुमारास हिमायतनगर तालुक्यातील मौजे बळीराम तांडा येथील फिर्यादी महिलेच्या घरी व घरासमोर तसेच साक्षीदार यांचे दुकाणामध्ये आरोपी सुजीत मधुकर राठोड, विशाल मधुकर राठोड, मधुकर वंसत जाधव तीघे राहणार बळीराम तांडा यांनी सोनु चव्हाण रा. मुदखेड तांडा, लखन रामदास चव्हाण रा. जाभंळी तांडा व ईतर 10 ते 12 जण गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी महिलेच्या घरी येवून घरात घुसून फिर्यादीची सासु सावित्राबाई हीस शिवीगाळ केली.

तसेच जीवे मारण्याचे उद्येशाने लोखंडी रॉडने तसेच हातातील पंचने डोक्यावर, दंडावर, पाठीवर, नाकावर जबर मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे सासुचे गळ्यातील सोन्याचे गंठन व कपाटातील ठेवलेले फिर्यादीचे सोन्याचे दागीने नगदी रक्कम असा एकुण 2,50000/-रुपयाचा माल जबरीने चोरून नेला. आणि फिर्यादीची साडी ओढुन तिचा विनयभंग करून फिर्यादी घरासमोर ठेवलेली फिर्यादीचे दिराची मोटार सायकल क्रमांक एम.एच-26- बी. वाय- 0038 वर लोखंडी रॉडने मडगार्डवर मारुन, पेट्रोलची टाकी फोडली.

तसेच चुलत सासरे यांचे दुकानातील सामान फेकुन देवुन अंदाजे 46000/- रुपयाचे नुकसान केले. अशी तक्रार पीडित महिलेणे दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात जबरी दरोडा व विनयभंग केल्याचा गुन्हा आरोपी: 01) सुजीत मधुकर राठोड, 02) विशाल मधुकर राठोड 03) मधुकर वंसत जाधव तीघे राहणार बळीराम तांडा तसेच 04) सोनु चव्हाण रा. मुदखेड तांडा 05) लखन रामदास चव्हाण रा. जाभंळी तांडा व ईतर 10 ते 12 जनावर कलम 307,452,327,354,143, 147, 148, 149, 427,504,506 भा.द. वी. अनुसार दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पूढील तपास पोलीस निरीक्षक बिडी भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोउपनि जाधव मँडम यांचेकडे देण्यात आला आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version