नांदेड| दि.२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे मा.डाक अधिक्षक श्री.राजीव पाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.डाक निरीक्षक श्री.प्रवीण भांजे साहेब यांनी बजाज आलियान्झ अपघाती पॉलशी दहा लाख रुपये व वार्षिक हप्ता ३९९रुपये या योजनेचा मेळावा पत्रकार बांधवांसाठी आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात भोकर तालुक्यातील पत्रकार व त्याचे परिवार येऊन योजनेचा लाभ घेतला. या मेळाव्याला सुरेश सिंगेवार यांनी अपघाती विमा पॉलशी संदर्भात सविस्तर माहिती देताना म्हणाले की, या दहा वर्षांत वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे दररोज कुठे ना कुठे अपघात घडतच असतात. सिंगेवार माजी डाक मार्केट अधिकारी हे पुढे बोलताना म्हणाले की कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा अचानकपणे मृत्यू झाला तर संपुर्ण कुटूंब मोडून पडते.संपुर्ण घरचं उध्वस्त होते,मुलाचे शिक्षण अर्धवट राहते, मुलीचे लग्न व शिक्षणाचा मोठे नुकसान होते.

आपल्या माघारे आर्थिक थोडा हातभार मिळावा.दुःख सावरून स्वताच्या पायावर उभे राहीपर्येंत आर्थिक मदत मिळण्यासाठी अपघाती विमा पॉलशी असणे आवश्यक असते. असे सिंगेवार यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. तसेच डाक विभागातील विविध योजनांची माहिती सिंगेवार यांनी दिली. या मेळाव्यात ऐकून 32 अपघाती विमा पॉलशी काडून घेण्यात आले आहे. यावेळी पोस्ट खात्यातीलल कर्मचारी पोस्ट मास्तर श्री.कैलास पाटील,पोस्टमन श्री.विजयकुमार कदम,शैलेश चक्ररवार,इंदू बोरकर, शाखा डाकपाल धानोरा श्री.साईनाथ बीओ,श्री,अजय बेरदेवाड शाखा डाकपाल सोनारी बीओ, श्री,संकेत हरकरे शाखा डाक पाल लागळुद बीओ यांनी हे मोठे पॉलशी कडण्यासाठी योगदान दिले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version