श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहरे। माहूर तालुका हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. या परीसरात डोंगर दर्या, नद्या असे नैसर्गिक नजारा लाभलेला असुन या नैसर्गिक साधन संपत्तीकडे आता राजकारण्यांची नजर लागली आहे.माहूर तालुक्याला वळसा घालून पैनगंगा नदी वाहून जाते.या नदीत बहुमुल्य वाळु उपलब्ध असल्याने या वाळुवर आता राजकिय लोकांची तथा वाळु तस्करांची नजर पडली आहे.

सध्या वाळुला जास्त भाव मिळत असल्याने मौजे लांजी येथील तथाकथित पुढारी व शरद पवार गटाचे शिलेदार हे आता या बहुमुल्य अवैध वाळूचे ठेकेदार झाले आहेत. दिवसा पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत चार चाकी वाहणात फिरायचं व राञी मात्र वाळु तस्करीचे काळे धंदे करायचे हे माजी.आमदार प्रदीप नाईक गटाच्या शिलेदारांचे रोजचे काम झाले आहे.

सध्या दि.६ जून रोजी पासून घरकुल लाभार्थ्यासाठी  मोफत वाळुचे वितरण चालु असले तरी खरी परस्थिती माञ काही वेगळीच आहे.वाळु डेपो मुळे वाळु चोरीला जात नसेल असा गैरसमज संबंधित विभागाला पडला असला तरी येथील वाळु तस्करांनी मागील आठवड्याभरापासूनच वाळु तस्करीला सुरवात केली असून बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने व वाढीव दरात वाळुचा पुरवठा केला जात आहे.तालुक्यात वाळुचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे वाळु माफिया शासनाचे उत्पन्न बुडवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मौजे लांजी हे अवैध वाळु तस्करीचे मुख्य केंद्र स्थान बनले असून येथूनच अवैध वाळु तस्करीची सुञ हलविले जाते अशी माहिती समोर येत आहे.

तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून डेपोच्या नावाचा फायदा घेत अवैध वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या समोरुण होत असल्याचे बोलल्या जात आहे.वाळु डेपो निर्माण करुण अवैध वाळु तस्करीला आळा बसेल असा समज संबंधीत प्रशासनाला असल्याने हीच संधी लांजी येथील वाळू माफियांनी हेरली असून बोटीच्या व जेसीबीच्या साह्याने दिवस राञ वाळु उपसा करुण दिवसा व राञीच्या वेळी प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध वाळुचे परिवहन सुरु आहे.यात शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत.तेव्हा या अवैध उत्खनन व वाहतुकीला जिल्हाधिकारी व किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी हे आळा लावतील का ? याकडे माहूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version