नांदेड| जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार ही योजना चिकू,पेरु, मोसंबी, लिंबू व सीताफळ या अधिसूचित पिकासाठी अधिसुचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2025-26 या वर्षासाठी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 4000 23 यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. यात मृग बहार विमा हप्ता दर हा पुढीलप्रमाणे आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 5 हजार रुपये. लिंबु पिकाची विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये तर सिताफळ फळासाठी विमा संरक्षण 70 हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा 3 हजार 500 रुपये तर चिकु फळासाठी विमा संरक्षण 70 हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा 4 हजार 900 रुपये तर पेरु फळासाठी विमा संरक्षण 70 हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा 3 हजार 500 रुपये एवढा आहे.

मृग बहार अधिसूचित महसूल मंडळे अंतर्गत अधिसूचित फळपीक , तालुके, अधिसूचित महसूल मंडळे, पिक विमा भरण्याची अंतिम तारीख, विमा संरक्षण प्रकार, विमा संरक्षण कालावधी याबाबतच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यासह शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, 8 अ उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो, बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल, कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाईन भरता येतील.

शासनाच्या ११ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टँक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे. त्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव नसणे, बोगस सातबारा व पिक पेरा नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेतीवर परस्पर अधिकृत भाडेकरार न करता विमा काढणे, उत्पादन क्षमता वयाची फळबाग नसताना विमा काढणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषीवर कायदेशिर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनीची राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून घेऊन उपरोक्त अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version