नांदेड| शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री , वृक्षप्रेमी उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आ. ज.मो. अभ्यंकर यांच्या प्रेरणेने व राज्य उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम साजरा करण्यात येत आहे.
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडेगाव, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेवडी (बा), तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा (दे ) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, तालुका उपाध्यक्ष नादरगे रमेश, पदवीधर शिक्षक शिवा येजगे, उमाकांत बेंबडे, मुख्याध्यापक धनेगावकर,अर्चना ठोळे, तेलंग बालाजी, मामीलवाड, खंदारे, भारती, पिंपळे, तोरे, शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.