नांदेड| तरोडा बुद्रुक येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर नांदेड येथे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापनासह इतर प्रश्न सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले.

रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी विकास नगर येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन डॉ. श्याम दवणे, सचिव परमेश्वर दिपके, नगरसेवक धम्मा कदम, पांडुरंग तारू, श्याम हटकर, मिलिंद व्यवहारे, गंगाधर सोनाळे, सुमेध पाईकराव, प्रतिक कावळे, भीमराव भद्रे, शंकर ईरलोड, दिलीप ढगे, अँड. वाघमारे, लोहाळे, दीपक कांबळे, लक्ष्मण सोनसळे, येरणाळीकर, सूर्यवंशी, शातांबाई औराळकर, खपले ताई, अर्चना दिपके, शीलाताई तारु, डोंगरे ताई, मयुरी दिपके आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी त्यांनी विकास नगर गार्डनमध्ये दहा बाकडे आणि ओपन जिम देण्याचे जाहीर केले. टप्प्याटप्प्याने विविध कामे करून नगरीचा विकास केला जाईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी सोसायटीच्या वतीने डॉ. श्याम दवणे यांनी पुष्पहाराने आमदार कल्याणकर यांचा सत्कार केला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version