लोहा। वैदयकीय क्षेत्रात २८ वर्षांच्या सेवेत “गरिबांचा डॉक्टर “अशी ओळख असलेले हृदयरोग तज्ज्ञ डॉ सुनील गायकवाड वसमतकर हे छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हृदयविभाग प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून ३०एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत समर्पित व प्रामाणिकपणे त्यांनी शासकीय सेवेत रुग्णसेवा केली

डॉ एस एम गायकवाड यांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतले मूळ वसमत येथील असलेले डॉ गायकवाड यावर वाहेगाव (ता परतूर )येथे प्राथमिक तर वाघाळा (ता .पाथरी)येथे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाले त्यानंतर आयटीआय केला पुन्हा बारावी सायन्स चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आंबेजोगाई येथे १९८६ते ९२ मध्ये एमबीबीएस पूर्ण झाले त्यानंतर एमडी झाले. ह्रदय रोग तज्ञ म्हणून त्यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले. १९९५ ते ९७ या काळात शासकीय मेडिकल कॉलेज नांदेड येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून सेवा केली.

१९९७ मध्ये लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाहिले हृदय रोग तज्ज्ञ म्हणून त्याची आठ वर्षे वैद्यकीय सेवा झाली त्यानंतर देगलूर, वसमत, हिंगोली, हिमायतनगर अशा ठिकाणी वैदयकीय अधीक्षक म्ह म्हणून त्यांनी रुग्ण सेवा केली”गरिबांचा डॉक्टर ” अशी त्याची ओळख .

यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले आई-वडील नातेवाईक याची सेवा तसेच दोन भाऊ तीन बहिणी असा परिवार.सुविद्य पत्नी वंदनाताई याची मोठी साथ त्यांना मिळाली मुलगा स्वप्नील एमबीबीएस तर मुलगी श्वेता हिने मुंबईत कायद्याची पदवी संपादन केली आहे .डॉ गायकवाड हे स्वतः एलएलबी एलएलएम आहेत .
छत्रपती संभाजी नगर येथील सामान्य रुग्णालयात त्यांनी हृदय रोग विभाग प्रमुख म्हणून त्याची रुग्णसेवा शेकडो जणांसाठी नवजीवन ठरली.

२८ वर्षाच्या सेवेनंतर छत्रपती संभाजी नगर येथील सामान्य रुग्णालयात हृदयरोग विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहे .शाहू -फुले -डॉ बाबासाहेब आंबेडकर – अण्णा भाऊसाठे यांच्या विचाराने ते प्रेरित झाले व शासकीय सेवा प्रामाणिकपणे केली व हजारो रुग्णासाठी देवदूत ठरले. त्याच्या अर्धांगिनी वंदनाताईंची याची लाभलेली साथ मोलाची होय .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version