मुंबई| राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता या दुष्काळाने होरपळून निघाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहेत तर जनावरांना चारा नाही. महाभ्रष्टयुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी व जनतेशी संवाद साधावा, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.

टिळक भवनमध्ये आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. जनतेने काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास दाखवलेला आहे. दुष्काळाने संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी सरकार उभे राहत नाही असे चित्र आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल.

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडेही मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, त्यासाठी खासदारांनी आपल्या मतदारसंघात दुष्काळी भागाचा दौरा करून आढावा घ्यावा. दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना आधार द्यावा तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version