नांदेड| राज्य शासनाने केलेल्या मेगाभरती जाहिरातीत अनेक विभागांच्या परीक्षा झाले असून, काहींचे निकाल बाकी आहेत तर काहींचे नियुक्त्या तसेच अनेक विभागांचे परीक्षा पण घ्यायचे आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून परीक्षा पुढे ढकलू नका अशा प्रकारची विनंती वारंवार सरकारकडे केली असतानाही याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले होते. याचाच फटका सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आले आले.

बहुतांश मतदान हे सुशिक्षित बेरोजगार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आहेत. तशा प्रकारचा इशाराही सरकारला देण्यात आले होते, भरती प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही विरोधकला मतदान करू आणि आम्ही ते करून दाखवले आहे असे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी म्हटले आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करीत परीक्षेसाठी फॉर्म भातून घेण्याचे करण काय होते. निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एक तर नव्याने पदभरतीची मंजुरी देता येत नाही. मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची भरतीसाठीची परीक्षा घेता येतात त्याचबरोबर निकालही लावता येतात. फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र आचारसंहिता नंतर दिले जावे अशा प्रकारचा पत्र निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्या नंतर पण सरकारला परीक्षा घेण्यास काय हरकत आहे असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सरकारला केले होते.

ग्रामसेवक, आरोग्यसेवक परीक्षा झाले की लगेच किंवा यांच्यासोबतच त्यांचेही परीक्षा घेण्यात यावे आणी पेसाचे निकाल आल्या नंतरच यांचे निकाल जाहिर करावे अशा प्रकारची मागणी यूरोपच्या वतीने करण्यात आले. महसूल, वनविभाग आणी कृषि विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार? इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्हयांचे परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यानी केले आहेत.

नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे गट ड पदाची जाहिरात आणि इतर विभागाचे जाहिराती आले असून या विभागांच्या परीक्षाही राहिलेले आहेत. सुशिक्षित बेरोजगारावर महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावे लागेल. स्वतःला हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून आम्ही शांत पद्धतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आंदोलन उपोषण करू असा महाराष्ट्रातील परीक्षार्थींच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्यावतीने इशाराही देण्यात आला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version