हिमायतनगर,परमेश्वर काळे| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी अंतरवाली सराटी या गावी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ हिमायतनगर येथे साखळी उपोषणाला दि.२८ ऑकटोबर रोजी दुपारी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली आहे. या साखळी उपोषणात जवळपास ५० हुन अधिक मराठा समाज बांधवानी सहभाग घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल नसल्यामुळे अंतरवाली सराटी जिल्हा जालना या गावी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ काळ दि. २७ रोजी सकल मराठा समाज बांधवानी बीआरएसचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या वाहनं फोडण्याचा आक्रमक पवित्र घेतला होता. दरम्यान चाभरेकर येथून निघून गेल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर आज दि. २८/१०/२०२३ रोज शनिवार सकाळी ११.०० वाजेपासून बसस्टॉप मैदान हिमायतनगर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेले ४० दिवसाचे अल्टिमेटम संपून गेले मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल नसल्यामुळे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज हिमायतनगरच्या वतीने येथील बसस्टॉप मैदानातं साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. साखळी उपोषण हे १५ दिवसापर्यंत चालणार असून यावरही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास तिव्र आंदोलने करण्यात येतील याची सर्वस्व जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version