हिमायतनगर, दाऊ गाडगेवाड। राज्यातील भोई समाजाची अतिशय बिकट परिस्थिती झाली असून त्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसून भोई समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहामध्ये भोई समाज महासंघ समितीची संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ मामुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. १५ जून रोजी कार्यकारणी जाही करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी विनायक वट्टटवाड तर उपाध्यक्षपदी माधवराव बावणे यांची निवड झाली आहे.

तसेच युवक तालुकाध्यक्षपदी माधव वदतवाड, युवक उपाध्यक्षपदी विठ्ठल वटटवाड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ कार्यकरणीमध्ये सचिव साहेबराव अष्टकर, कोषाध्यक्ष प्रकाश बोरकर, कार्याध्यक्ष रामराव टोकलवाड, सल्लागार ॲड. ज्ञानेश्वर पंदलवाड, संघटक परमेश्वर उट्टलवाड, सुरेश टोकलवाड, संजय पंदीलवाड, शंकर डाके, संजय उट्टलवाड, संभाजी उट्टलवाड शिवाजी भट्टेवाड यांची सदस्यपदी तर संपर्क प्रमुख संतोष टोकलवाड यांची निवड करण्यात आली.

युवक कार्यकारणीमध्ये सचिवपदी दाऊ गाडगेवाड, कोषाध्यक्ष व्यंकटेश पामलवाड, कार्याध्यक्ष साहेबराव वटटवाड, संघटक नितिन भट्टेवाड, संपर्क प्रमुख अंकुश उट्टलवाड, सल्लागार सयाजी वटटवाड, सहसल्लागार पंजाब वटटवाड, संतोष वटटवाड, अंकुश शहारे, ऋषिकेश नागलवाड, गणेश भट्टेवाड, विकास भट्टेवाड, आतिष वटटवाड, किरण उट्टलवाड यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ मामुलवार, निषादपार्टी जिल्हाध्यक्ष श्रीराम डुबुकवाड, जिल्हा सल्लागार गोविंदराव कोलंबीकर, जिव्हा उपाध्यक्ष माधव गंधलपवाड, समाजसेवक श्रीराम टोपलवाड, मांडवीचे सरपंच सुर्यभान डुबुकवाड, लोहा तालुकाध्यक्ष पुंजाजी शेवडकर, नवरंगपुरा ग्रां.पं.सदस्य सखाराम उट्टलवाड, डॉ. व्यकटेश निलेवार, बळेगावचे चेरमन गोविंदराव डुबुकवाड, उमरीचे तालुकाध्यक्ष बालाजी गाडेवाड, उमरीचे ता. उपाध्यक्ष गोविंद महाराज शेलगांवकर, समाज सेवक गंगाधर डुबुकवाड, प्रमोद भट्टेवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष विजय उट्टलवाड यांनी केले. निवडीच्या वेळी मोठ्या प्रमाणात भोई समाजातील नागरीक व महिला उपस्थित होत्या.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version