नांदेड/किनवट। तालुक्यातील सर्वात मोठी आणि मालदार ग्रामपंचायत असणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत सावळा गोंधळ नेहमीचं चाललेला असतो.काही वर्षं आधी तंटामुक्ती भवन बांधकामातील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि गुन्हे नोंद झाल्याने भ्रष्टाचाराला कुठे तरी आळा लागेल असे वाटले होते,परंतु म्हणतात ना स्वभावाला औषध नसते; तसेच भ्रष्टाचाराच्या पैशांचा नशेत मदमस्त झालेल्यांना सर्व सामान्य गोरगरीब जनतेसाठी आलेल्या विकास निधीचे काय घेणे की देणे.? सर्व सामान्य जनतेचा सर्वांगीण विकासासाठी जनतेने निवडून दिलेल्या ग्रामपंचायत गोकुंदा येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य् यांनी सप्टेंबर २०२२ ते आजपर्यंत 15 वा वित्त् आयोग, जनरल निधी व इतर कामाचा आलेला विकास निधी वर जुनीच कामे नविन दाखवून अंदाजे 1 कोटी 40 लाख रूपयाचा अपहार केलेला आहे आणि सदरील प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करणे बाबत लेखी निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्वात गब्बर आणि मालदार ग्रामपंचायत असलेल्या मौजे गोकुंदा ग्रामपंचायत येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य् यांनी संगनमत करून ग्रामसेवकला हाताशी धरत 15 वा वित्त् आयोग, मालमत्ता कर आणि विविध प्रकारचे करचे माध्यमाने जमा झालेल्या जनरल निधी व दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना,अल्प संख्यांक विकास योजना आणि इतर विकास निधीतुन थातुर-माथुर पध्दतीने कामे करून व अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करता तसेच काही जुनी 14 व्या वित्त आयोगाची कामे नविन दाखवून निधी हडपण्याच्या उद्देशाने केली आहेत. तसेच काही कागदोपत्री दाखवून निधी हडप केलेला आहे. तसेच कुठल्याही कामाचे ई-टेंडर न करता आर्थीक् स्वार्थासाठी स्वतः गुत्तेदारी केलेली आहे.

तसेच 15 वा वित्त् आयोग व जनरल निधी व तसेच इतर विकास निधीमधून सरपंच अनुसया सिडाम, उपसरपंच शेख हैदर शेख मुसा,सदस्य् ज्ञानेश्वर् सिडाम, प्रमोद मुनेश्वर्, निर्मला कांबळे, कल्पना भरकाडे, संजय सिडाम, शेख बिस्मिल्लाबी अब्दूल गणी, ज्योतीबा गोणारकर, जिजाबाई मुकाडे, दत्ता भिसे, वच्छलाबाई नागभिडे, रहिमा शेख सलिम, रेखा दांडेगावकर, पुण्यरथा बोडके, यांनी संगणमताने निधी कामे न करताच बिले उचलुन अंदाजे 1 कोटी 40 लाख रूपयाचा अपहार केलेला आहे व घराचा व खुल्या जागेचा कर जमा करून पावती न फाडता कर रजिस्टरला (निल) बे-बाकी करून अपहार केलेला आहे.त्यामुळे कर स्वरूपात येणारा निधीचा उपयोग स्वस्वार्थासाठी करत आहेत. तसेच इतर विकास कामासाठी आलेला निधी व १५ वित्त् आयोग निधी मधुन काही कामे जुन्याच कामांना नविन दाखवून निधी हडप केलेला आहे.

सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर योग्यती कार्यवाही करत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व अभिलेखे जप्त करून प्रशासक लावत कारभार आपल्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावा. सदरील प्रकरणी आपण कसलीही दखल न घेतल्यास गट विकास अधिकारी यांचा कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्याचे सर्व सामान्य ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे.

चौकशी अधिकारी असलेल्या विस्तार अधिकारी ढवळे साहेब यांच्याकडे नांदेड जिल्हा परिषदेची खुपचं मोठी जबाबदारी असल्याने ते नेहमीचं नांदेड येथे राहतात त्यांना तिथल्या कामातून वेळ मिळाला तर ते चौकशी करतात आणि चुकून वेळ मिळालाच तर चौकशीचा नावावर ग्रामसेवकांना अभिलेखे सादर करण्यास वारंवार वेळ देवून चौकशीची ऐशीतैशी होईल याची पुरेपूर काळजी घेताना ते दिसतात.चौकशी अधिकारी बदलण्याची मागणी केली तरी गट विकास अधिकारी साहेब चौकशी अधिकारी बदलत नाहीत यात काय गौडबंगाल आहे हा पि.एच.डी करणाऱ्यांसाठी संशोधनाचा विषय नक्कीचं होवू शकतो.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version