नांदेड। २६-२७ जुलै रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि अनेक गोरगरीब लोकांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले होते.सीटू संलग्न नांदेड जिल्हा आतापर्यंत दहा आंदोलने करण्यात आली परंतु खऱ्या पूरग्रस्तांना डावलले आहे हा प्रश्न पुन्हा ऐरनीवर आला आहे.

हजारो बोगस पूरग्रस्तांची बनावट यादी तयार करून नऊ कोटी रुपये आपल्या मर्जीतील लोकांना वाटप करण्याचा यशस्वी प्रयत्न मनपा आणि तहसील प्रशासनाने केला असून बोगस पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग होत असलेली प्रक्रिया तातडीने थांबवावी. बील कलेक्टर आणि तल्याठ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५६ आणि ५७ नुसार निलंबनाची कारवाई करावाई. तीन महिन्यापासून प्रत्यक्षात पाहणी करून नावे समाविष्ट करावीत म्हणून पूरग्रस्तांनी अर्ज केले होते. मग तलाठी आणि वसुली लिपिकांनी घरोघरी जाऊन पाहणी का केली नाही असे अनेक प्रश्न निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. तातडीने उर्वरित नावे घेण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळास सांगितले.

या आंदोलना बरोबर कासारखेडा ता. जि. नांदेड येथील बचत गटाच्या पीडित महिला देखील सीटू च्या नेतृत्वाखाली कर्ज माफ करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसल्या आहेत. तसेच वाजेगांव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय पोषण आहार कामगार विविध मागण्यासाठी उपोषण करीत आहेत. पूरग्रस्तांची अंतिम यादी अजून पूर्ण झाली नसून जोपर्यंत खऱ्या लाभार्त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु राहील अशी भूमिका सीटू कामगार संघटनेने घेतली आहे.

मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर येथे मागील पन्नास वर्षात प्लॉट्स पडले नाहीत तेथे मागणी केलेल्या अर्जदारांना प्लॉट देण्यात यावा तसेच घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये सोलापूर कुंभारी च्या धरतीवर देण्यात यावेत ही मागणी देखील उपोषणात करण्यात आली आहे. बोगस पूरग्रस्तांचा मुद्दा चार ते पाच कोटी रुपयाचा अपहार केल्याचे सिद्ध करेल असे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी यावेळा संबोधित करताना सांगितले. सदरील आंदोलनात शकडो लोक सामील झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.श्याम सरोदे, कॉ. कांताबाई तारू,कॉ.रेखा गजभारे,वर्षाताई हिंगोले, सविताबाई गायकवाड, सयाबाई राक्षसमारे,, कॉ. सोनाजी गायकवाड, कॉ. लता कांबळे, दैवशाला साबळे, बेगम बी शेख गफार, मेहरूण बेगम शेख हुजूर आदींनी केले आहे.सीटू च्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. तर टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी पाठींबा दिला आहे.

सुरु असलेले बेमुदत आंदोलन प्रश्न मार्गी लागल्याशिवाय संपणार नाही असा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version