नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व मुंबई येथील हाय मीडीया लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने जैवशास्त्र संकुलामध्ये ‘अॅडव्हांस टेक्निक्स इन मॉलिक्युलर बायोलॉजी’ या विषयावरील सात दिवसीय कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेचे उ‌द्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जैविकशास्त्र संकुलातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या पीएम-उषा यांच्या अर्थ सहाय्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. यामध्ये एसडीएस पेज, ट्रान्स्फॉरमेशन, पीसीआर अॅम्प्लीफिकेशन, अॅगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसीस, सदर्न ब्लॉटींग, आयोन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आणि प्लाझमीड डीएनए आयसोलेशन या तत्राचा अंतर्भाव करण्यात आला होता. यासाठी हायमीडीया लॅब्रोटरीज येथील तज्ज्ञ डॉ. सुनील कोकणे, मनोज बोरसे आणि संकुलातील डॉ. उमेश धुलधज, डॉ. इर्शाद बेग यानी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे आयोजक डॉ. एल.एच. कांबळे व सह आयोजक डॉ. एस. पी. चव्हाण होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संकुलाचे संचालक डॉ. बी. एस. सुरवसे यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. मिलींद गायकवाड, डॉ. अमृता कनकदंडे, गौतम कांबळे, प्रतीभा ढवळे, डॉ. सुयश कठाडे, रुबीया शेख, सय्यद शाजीम, समरिन पठाण, गोविंद सुर्यवंशी, विद्या सुकरे, प्राजक्ता चांडोळकर तसेच सौ. वसुधा कोडगीरे, राजू शेरे, सयद खाजा, सुशील खरवडकर, रामा पिपळे, नामदेव कोमटवार आदीनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version