नांदेड। धर्माबाद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत भारतीय जनता पार्टीने  पक्षाची संघटनात्मक बांधणी जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे आणि आ. राजेश पवार यांच्या पुढाकारातून जोरदार सुरू केली आहे . धर्माबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतूकराव हंबर्डे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा मध्ये जाहीर रित्या प्रवेश केला आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष डॉ संतूकराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेवटच्या घटकापर्यंत भाजपाची ध्येयधोरणे पोहचावीत असताना पक्षाची संघटनात्मक बांधणी ही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आ. राजेश पवार यांच्या पुढाकारातून नायगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धर्माबाद येथील पंचायत समितीचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकांत वाघमारे,  करखेलीच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी नानाराव कदम , करखेलीचे सरपंच तुकाराम खाडे यांच्यासह प्रकाश शिवलाड , नामदेव हेमके,  शेख अनवर शेख अहमद,  सादिक मदरसाब कुरेशी , अहमद पटेल, फज्जू पटेल,  योगेश वाघमारे , महमूद पठाण, मनोज क्षीरसागर , आकाश वाघमारे, प्रवीण वाघमारे, अविनाश वाघमारे, गणेश वाघमारे, कैलास सोनकांबळे, श्रीकांत वाघमारे,  मोहम्मद सलीम,  रवी कुमार काळेकर , नयुन शेख खुर्शीद , शेख गुलाम अफिज , शेख अबिजर अहमद , शेख सुदिक शेख बाबूमिया,  शेख फौजान शेख फज्जु, शेख अफिग शेख गुलाम,  शेख समीर शेख अनावर ,  शंकर सोनकांबळे,  किरण सोनकांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आ. राजेश पवार आणि जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे .
येणारी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकणार असून देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी कारभार चालविला जाणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराला आळा घातला असल्याने आगामी काळात सर्वसामान्यांच्या हिताचे राजकारण होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉक्टर हंबर्डे यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी धर्माबाद भाजपाचे तालुका अध्यक्ष विजयकुमार डांगे, भाजपाचे जिल्हा चिटणीस काशिनाथराव कुलकर्णी, धर्माबादचे शहर अध्यक्ष रमेश गोड, युवा मोर्चाचे अध्यक्ष विठ्ठल अष्टंगे यांच्यासह धर्माबाद येथील प्रमुख भाजपाचे कार्यकर्ते यांचे उपस्थिती होती.
Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version