उस्माननगर, माणिक भिसे। कापसी (बु) ता. लोहा येथे गावाच्या दक्षिणेस भगवान वडवळे यांची शेती असून त्या शेतीमध्ये त्यांनी गजरा गवताची लागवड केलेली आहे. दि.१ डिसेंबर रोजी तेथील चारा घेण्यासाठी गेले असता त्यांना त्याठिकाणी उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे जाणवले त्यांनी आजूबाजूला पहिले असता गजरा गवतामध्ये कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत अर्धवट शरीर असलेला व कुत्र्यांनी लचके तोडलेल्या स्थितीत शिर धडावेगळे असलेल्या स्थितीत असलेला मृतदेह त्यांना आढळुन आल्याने त्यांनी याची माहिती गावातील पोलीस पाटील दयानंद कांबळे यांना दिले . पहाता पहाता ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली. त्यांनतर याची माहिती उस्माननगर पोलीस ठाण्यास कळवण्यात आली.

सदरील घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे , पोलीस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर , बीट जमादार श्रीमंगले, हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड आढळुन आले चौकशी केली असता सदरील व्यक्ती ही ऊसतोड कामगार असून कंधार तालुक्यातील भुत्याचीवाडी येथील रहिवासी
अशोक सूर्यभान गटमवाड वय वर्षे 33 असून व १४ नोव्हेंबर रोजी पासुन कामासाठी जात आहे .असे सांगून घरातून बेपत्ता होता.

सदरील व्यक्ती हरवल्याची तक्रार उस्माननगर पोलीस ठाण्यात दि.17 नोव्हेंबर रोजी नातेवाइकांच्या वतीने देण्यात आली होती. मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. प्रेत जास्त सडलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आली यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन केले. दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मृत अशोक गटमवाड यांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं असा परिवार आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version