नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात शेकडो बौद्ध उपासक उपासकांनी सहभाग नोंदविला असून दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी भिख्खू संघासह अप्पर जिल्हाधिकारी पी. बोरगावकर, आंबेडकरवादी मिशनचे केंद्रप्रमुख दिपक कदम, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश दादा सोनाळे, श्रीकांत दादा गायकवाड, प्रफुल दादा सावंत, सुरेश हटकर, नगरसेवक देवराव खंदारे, प्रचार मंत्री गंगाधर ढवळे, सुखदेव चिखलीकर, प्रभू सावंत, संदीप मांजरमकर, रविंद्र सोनकांबळे, प्रितम जोंधळे, जी. बी. सोनकांबळे, इंजी. भरत कानिंदे, टी,पी. वाघमारे, प्रा.साहेबराव इंगोले, प्रा. एस.एच.हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, एस.एन.गोडबोले, सिद्धार्थ थोरात, प्रा. बापुराव वाटोडे, संजीव गोणारकर, अशोक लोकडे, चांदू लोकडे, मिलींद कांबळे, ऍड. हिरानंद गायकवाड, रवि बुरड, राजु खंदारे, बाळासाहेब मस्के, प्रमोद डोंगरे आदींची उपस्थिती होती.
येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम, महारक्तदान शिबीर, मोफत दंतरोग तपासणी शिबीर, आनापान ध्यानसाधना, दान पारमिता, भोजनदान, बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात मान्यवरांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करून २००० रोपांच्या वृक्षारोपण अभियानास प्रारंभ झाला. रक्तदान शिबीरात ३०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर डॉ. अपेक्षा हाटकर, डॉ. कांचन कोकरे आणि डॉ. संध्या कांबळे यांच्या मोफत दंतरोग तपासणी शिबिराचा २५० रुग्णांनी लाभ घेतला.
अभिष्टचिंतनासह गाथापठण, आनापान ध्यानसाधना, भव्य भोजनदान आणि दान पारमिता कार्यक्रम संपन्न झाला. भीमशाहीर सुभाष लोकडे यांच्या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी संपादित केलेल्या संघनायक या विशेषांकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच त्रिसरण पंचशील मुद्रांकित भित्तिपत्रकाचेही विमोचन करण्यात आले. संस्थेच्या वतीने आयोजित सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी ठिकठिकाणच्या बौद्ध उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले. यात शेकडो बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिकांची उपस्थिती होती.