नांदेड। जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासह, नांदेड महानगरपालीका क्षेत्रात मोठया प्रमाणात गोवंशाची कत्तल चालुच आहे. आम्ही प्रशासनाच्या सुचनेनुसार माहीती देउन देखील पोलीस प्रशासनाकडुन स्वयंस्फुर्तपणे कारवाया केल्या गेल्या नाहीत. काही गाडयांवर कैक केसेस असतांना, त्या वाहनं आजतागायत गोवंशाची वाहतुक करत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात दि.०४ मार्च २०१५ पासुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा १९९५ (सुधारीत) करण्यात आला आहे.
सदरील कायद्यानुसार गायींची, वळुंची बैलांची आणि शेतीस उपयुक्त व प्रजनन योग्य प्राण्यांची कत्तल करण्यास मनाई आहे. प्राणी अत्याचार अधिनियम आणि मोटर वाहन अधिनियम १२५, भारतीय दंड संहीता अंतर्गत प्राण्यांसोबत कुरपणे व्यवहार करण्यास प्रतीबंध आहे. आणि मा. पोलीस महासंचालक यांनी प्राण्यांच्या कारवाई दरम्यान करावयाच्या उपाय योजनां विषयीच्या मार्गदर्शक सुचनांची (एसओपीची ) देखील पोलीस प्रशासनाने अंमलबजावणी करावी.
आरोपीचे सिडीआर काढुन संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. या व्यवसायात गुंतलेल्या बऱ्याच कसायांवर एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, जे भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी आम्ही दिलेल्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणाऱ्या वाहनांची माहीती कसायांना पुरवणाऱ्या कर्मचाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी. चौकशीच्या नावाखाली संबंधित मनाठा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यास त्वरीत निलंबित करावे.
सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही कायद्याच्या चौकटीत राहुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करतोत, प्राण्यांच्या कारवाई दरम्यान योग्य ती मदतही करतोत तरीही नांदेड पोलीस सातत्याने आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी १४९ अंतर्गत नोटीस देने, तडीपारीचे प्रस्ताव बनवने, खोटे गुन्हे दाखल करणे आदी प्रयत्न सातत्याने करत आहेत, ज्यामुळे पारदर्शक सरकारची देशात बदनामी होत आहे. हे त्वरीत थांबले पाहिजे.
आम्हाला पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन काम करायचे आहे, तसे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे. संघर्ष करण्याची आमची इच्छा नाही. वरील मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून अवैध कत्तलखाने शोधून उध्वस्त केले पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे, अकारण नोटीस बजावने बंद केले पाहिजे. या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही दि १५ फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर साखळी उपोषण करण्यात येईल. असे राजेशजी जैन – प्रांत गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद, किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी सांगितले आहे. यावेळी ॲड जगदीशजी हाके, शशिकांत पाटील, विभाग सहमंत्री, गजानन पांचाळ, बजरंग दल प्रांत सहसंयोजक यांनी देखील मनोगत व्यक्त केले.