नांदेड। आता नश्याच्या आहारी जात आहेत आणि अल्पवइन मुलींना टार्गेट करताना दिसून येत आहे. पुन्हा रोहिपिंपळगाव सारखी घटना होता होता टाळली आहे. काल रात्री एका ९ वर्षीय अल्पवीन मुली सोबत सोनखेड हद्दीत शेळगांव येथे घडली असून, नशेत तर्र असलेल्या युवक बालिकेवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता. मात्र बालिकेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आखाड्यावर असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आणि नागरिकांनी दाखविलेल्या सर्तकतेने मुदखेड सारख्या घटनेची पुनरावृत्ती टळली. तर सोनखेड पोलिसांनी फरार झालेल्या नशेखोर युवकास पकडून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड जिल्ह्यात सध्या अनेक युवा वर्ग विविध प्रकारच्या नशेच्या आहारी जात आहेत. यातून गंभीर गुन्हे घडत आहेत. एवढेच नव्हे तर अल्पवयीन बालिका, मुलिंना टार्गेट केले जात आहे आणि यातून अंत्यत दुर्दैवी घटना घडत आहेत. अवघ्या काही दिवसांपुर्वीच मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून दोन जणांनी तिचा खून केला होता. या घटनेमुळे नांदेड जिल्हा हादरून गेला याची चर्चा अजूनही थांबली असताना दुसरी नवीन घटना समोर आली आहे.

सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी एका गावातील मारोती मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठया संख्येत महिला, पुरूष, युवक-युवती, बालक- बालिका उपस्थित झाल्या होत्या. याच प्रमाणे नांदेड शहरातील नमस्कार चौकात राहणारा २५ वर्षीय युवक बापुराव पाडदे हा त्याच्या मामाच्या गावात आला होता. भंडाऱ्याचे जेवन करून एक ९ वर्षीय बालिका रात्री ९ च्या सुमारास परत आपल्या घराकडे जात होती. तिला एकटी पाहुन, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तुला तुझ्या घरी सोडतो असे सांगुन त्याने बालिकेला आपल्या दुचाकीवर बसवले. यानंतर इकडे- तिकडे फिरून शेलगाव शिवारातील शेताच्या दोन आखाडयांच्या मध्ये बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत तिने जोरात ओरडण्यास सुरुवात केली. सुदैवाने त्या दोन आखांड्यां वरील काही नागरिकांनी हा आवाज ऐकून बाहेर धाव घेत बॅटऱ्या लावून आले. तेव्हा त्यांना हा गंभीर प्रकार दिसला या नागरिकांना पाहताच अत्याचार करण्याचा प्रयत करणारा बापुराव पाडदे पळून गेला. सुदैवाने आखाड्यावरील नागरिकांच्या सतर्कतेमुळेदुर्दैवी घटना टळली.

घटनेची महिती सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने आणि त्यांचे सहकारी वेळेत जावून काही तासातच बापूराव पाडदेला अटक करून भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायदा प्रमाणे गुन्हा क्रमांक १९/ २०२४ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती सक्षम पणे सांभाळली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू दिला नाही. एकूणच या घटनेमुळे नांदेड पोलिसांच्या पुढे पुन्हा नवीन आव्हान उंभे राहिले असून, अश्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती आणि नागरिकांना समुपदेशन करून आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version