नांदेड| २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शेवगाव जि. अहमदनगर येथे पार पडलेल्या पद्मभूषण कै. बाळासाहेब भारदे स्मृती राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत महात्मा फुले स्कूल विजयनगर नांदेड चा आठवीचा विद्यार्थी वेदांत सचिन टोंगळे याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला असुन त्याला ५०००/- रुपयांचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याचा लहान भाऊ इयत्ता चौथीचा विद्यार्थी सिध्दांत सचिन टोंगळे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे. त्याला ३००/- रुपयाचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही भावंडांनी यावर्षीचा वक्तृत्व स्पर्धेत मानाचा मानला जाणारा पद्मभूषण कै. बाळासाहेब भारदे स्मृती करंडक पटकाविला.
या दोन्ही भावंडांचे त्यांच्या शिक्षकांकडून, स्पर्धा आयोजकांकडून, कदम कोचिंग क्लासेस कडून तसेच सर्वच स्तरातून कौतूकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही स्पर्धकांना त्यांचे पालक कवि सचिन टोंगळे व पूनम टोंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.