नायगांव, रामप्रसाद चन्नावार| दि २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय लालवंडी ता.नायगाव येथील ग्रामपंचायतवर भगवानराव पाटील लंगडापुरे गटाने एक हाती सता मिळवली. गावकऱ्यांनी पॅनल प्रमूख भगवान पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन सत्ता दिली
भगवान पाटील यांनी पत्रकांराशी बोलतांना सांगितले कि, मी विश्वासास तडा जाऊ देणार नाही. एकेरी वर्चस्व प्रस्थापित करून 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड व तहसीलदार नायगाव यांच्या आदेशाने लोकनियुक्त सरपंच सौ . अश्विनी प्रकाश जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. उपसरपंच पदी श्री भगवानराव शंकरराव पा. लंगडापुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रा.पंचायतचे नवनिर्वाचित सर्व सदस्य तसेच सेवा सोसायटिचे सर्व संचालक उपस्थित होते.
सभेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी कानोडे जि.बी.सचिव ग्रामसेवक श्री संदीप मोरे, तलाठी श्री चमकुरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रमूख अतिथी व मार्गदर्शक बाबूरावजी लंगडापूरे, रमेश पाटील शिंदे, शिवराम आप्पा यरसनवार, अॅड नारायण लंगडापूरे, शेषराव लंगडा पूरे, बालाजी बामनपल्ले, व्यंकटराव इंद्रे, व्यंकटराव येरसनवार, राजेश लंगडा पूरे , सतीश केरुरे, गणपत जोधंले, अजीत लंगडापूरे, आदी उपस्थित होते.