श्री नरोबा लक्ष्मी देवस्थान कौठा आयोजित सामुदायिक तुलसी विवाहास ऊत्सफुरत प्रतिसाद

नवीन नांदेड। श्री.नरोबा लक्ष्मी मंदीर देवस्थान कौठा नांदेड यांच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी आयोजित सामुदायिक तुलसी विवाह मध्ये परिसरातील अनेक महिला भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला यावेळी प्रथम लताबाई बालाजी शिंदे तर राधाकृष्ण भुमिकेत ऋषीकेश मंठाळकर तर राधा भुमिकेत अंकाशा कुमठेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर अनेक बालकांनी राधाकृष्ण भुमिका यांच्यी वेशभूषा साकारली होती.
नरोबा लक्ष्मी देवस्थान कौठा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही १४ व्या वर्षी सामुदायिक तुलसी विवाह आयोजन करण्यात आले होते,या वेळी शिंदे यांच्या संगीत संचाचे आयोजन करण्यात आले होते,पांरपरिक गिते,आरती ,भजन यासह अनेक मराठी हिंदी गिते गायली तर पुरोहित व्यंकटेश गुरू,व श्रीपाद मुळी यांनी विधीवत पुजन करून मंत्रोपंचार केले तर उपस्थित भाविक भक्तांचे स्वागत मंदीर देवस्थान समितीचा वतीने अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगा प्रसाद काकडे व पदाधिकारी यांनी केले.
या तुलसी सामुदायिक विवाह सोहळ्यात आरती पांगरकर,लताबाई शिंदे, सुनंदा कोटूरवार,विमल शिंदे, ललिता एळगे, अनिता ठाकूर, माया खेडकर, गायत्री खेडकर,यमुनाबाई वडे,अंजली पोपटाने, शारदा बेरुळकर, रजनी चौधरी, कल्पना निदानकर, प्रियंका हुसे, मिनाबाई धोंडगे यांनी आकर्षक व विधीवत सजावट केली, तर राधाकृष्ण भुमिकेत कृष्ण समर्थ, पुरभुज,सोहम, पुरभुज, शिवम, पुरभुज, गणेश वडे यांनी तर राधा भुमिकेत वैष्णवी धोंडगे, वेदाक्षी कापसे, मिनाक्षी कापसे, आराध्या आहिरे यांनी भुमिका साकारली.
यावेळी अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे नगरसेवक राजु पाटील काळे,निळकंठ काळे, बालाजी देऊळगावकर, जिवन रोडे, तुलजासिंह ठाकूर, विनोद काकडे, रामदेव पंडित, देविदास डुबुकवाड,अशोक दिलेराव,निरंजन काकडे,यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थित होते.
यावेळी सामुदायिक तुलसी विवाह मध्ये प्रथम लताबाई शिंदे,दितीव्य शारदा शैलेश बेरूळकर,तृतीय,प्रियंका खुशाल राव धानोरकर यांना तुलसी सजावटीसाठी यांना नगरसेवक राजु काळे पाटील, व मंदीर विश्वस्त समिती यांच्या वतीने पारितोषिक व रोख पुरस्कार देण्यात आले तर उपस्थित भाविक भक्तांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नवीन व जुना कौठा परिसरातील अनेक महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामुदायिक तुलसी विवाह यशस्वीतेसाठी मंदीर समिती व पदाधिकारी व बाळु मंठाळकर, नागनाथ बोडके,मोहन आसुरे,यांनी परिश्रम घेतले.
