नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बागायत शेती व जिरायत शेतीतील पिके, फळबागा, भाजीपाला व शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनावरे दगावून पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये नुकसान झालेली आहे त्याचबरोबर गहू, हरभरा, संत्रा, केळी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जिल्ह्यात जवळपास 5000 हेक्टर शेतीचे नुकसान झालेली असतानाही शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना दिलासा देण्यास कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर यापूर्वी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई रकमांचे वाटप करावे , शेतकऱ्यांना विम्याची रक्कम सुद्धा शासनाकडून त्वरित देण्याची व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून पाठवण्यात आलेले आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, प्रा डी बी जांभरुणकर, सुभाष गायकवाड ,भाऊसाहेब गोरठेकर, डॉ विक्रम देशमुख, रंगनाथ वाघ ,प्रांजलीताई रावणगावकर, दिगंबर गवळी, शिवाजी पाटील जाधव, बालासाहेब मादसवाड, रामदास पाटील जाधव, गजानन पाम्पटवार ,विश्वनाथ बडूरे ,रमेश माळी ,रमेश गांजापुरकर, चंपतराव हातांगळे, प्रकाश मांजरमकर ,देवराव टिप्परसे लक्ष्मीकांत पदमवार ,अंकुश देसाई ,सुनील पतंगे, गफारखान रेखा राहिरे ,चंपतराव हातांगळे, प्रकाश मांजरमकर, देवराव टिप्परसे, हनुमंत जगदंबे ,पंडित जाधव ,प्रकाश धुपे ,शिवराज पवार, इंजि सुभाष रावणगावकर दत्तराव मोहिते ,चिवडे मुकुंदराव, बाबाराव थोटे ,श्रीनिवास जाधव, अंगद केंद्रे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते