नवीन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या येथील इंदिरा गांधी महाविद्यालयानेयेथील इंदिरा गांधी महाविद्यालयाने सुवर्णपदकयेथील इंदिरा गांधी महाविद्यालयाने सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय येथे नुकत्याच अंतर महाविद्यालयीन कझोन वेट लिफ्टिंग स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. सदर स्पर्धेमध्ये इंदिरा गांधीमहाविद्यालयाचा बी.ए.तृतीय वर्षाचा खेळाडू कांबळे गणेश कैलास याने 55 किलो वजन गटात सहभागी होऊन एकूण 85 किलो वजन उचलून महाविद्यालयात सुवर्णपदक पटकावून दिले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय राज्यमंत्री डी.पी. सावंत,सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर,खजिनदार ॲड. उदयरावजी निंबाळकर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद नरेंद्र चव्हाण, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर .पी माळी, डॉ.मिर्झा,एस.बी.यांनी या खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विजेत्या खेळाडूस क्रीडा संचालक डॉ. बाबुराव घायाळ क्रीडा शिक्षक,डॉ.रमेश नांदेडकर डॉ.रंजना अडकिने,डॉ.अभिजीत खेडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.