नविन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली पोटी उपायुक्त(महसूल) डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी १२ आक्टोबर रोजी क्षेत्रीय कार्यालय सिडको येथे बैठक घेऊन दैनंदिन वसुली सह थकीत मालमत्ता कर वसुली चा आढावा घेतला. थकबाकी मालमत्ता धारका वर जप्ती कार्यवाही करून कर संकलनाचे उदिष्ट महिन्या अखेरीस साध्य करण्याचे निर्देश दिले.तसेच संबधित वसुली लिपीक दिलेले उदिष्ट साध्य करणार नाहीत त्याचावर सक्त कार्यवाही करण्याचा ईशारा उपायुक्त (महसूल) डॉ पंजाबराव खानसोळे यांनी आढावा बैठकीत दिला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता करापोटी जवळपास ४५ कोटी रुपये थकीत असुन मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त(महसूल) डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मालमत्ता कर आढावा बैठक घेतली. यावेळी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक सुधीर बैस, दिपक पाटील यांच्या सह वसुली लिपीक यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी मालमत्ता कर वसुली पोटी थकबाकी धरका कडे केवळ पन्नास हजार रक्कम असलेल्या केवळ पाच धारकाविरूध्द केलेली कार्यवाही व वसुली लिपीक यानी केलेल्या कार्यवाही बाबत आढावा घेऊन पन्नास हजार रुपये वर थकबाकी असलेल्या जवळपास ६०५ मालमत्ता धारक यांच्या कडील थकीत करापोटी ड्रेनेज, पाणी पुरवठा कनेक्शन बंद करून वसुली करावी व वसुली लिपीक यांनी प्रत्येकी दैनंदिन उद्दीष्ट साध्य करावे व आक्टोबर अखेर २ कोटी रुपये उदिष्ट दिले आहे.
मालमत्ता कर वसुली कामात निष्काळजीपणा करण्यारा कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्यावर कार्यवाही करण्याचा ईशारा दिला आहे. यामुळे वसुली साठी दुर्लक्ष करणारे वसुली लिपीक मालमत्ता धारक यांच्या कडे गेल्याचे दिसून आले आहे. मालमत्ता धारकांनी ५० % शास्ती माफी योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त कर भरणा करावा व जप्ती सारख्या अप्रिय घटना टाळावेत असे आवानही उपायुक्त डॉ. खानसोळे यांनी केले आहे.