नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा क्रिकेट कर्मचारी संघ दि. २६ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ या दरम्यान नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ‘कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट’ स्पर्धेसाठी नागपूर येथे रवाना झाला आहे. दि. २५ डिसेंबर रोजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघास भेट देवून शुभेच्छा दिल्या.
या संघामध्ये गोविंद सोनटक्के (कर्णधार), रशीद शेख (उपकर्णधार), जयराम हंबर्डे, शैलेश कांबळे, शिवाजी हंबर्डे, दुर्गादास रोकडे, ज्ञानेश्वर पुयड, प्रकाश मुपडे, मनोज टाक, अशोक कत्तेवार, संभाजी चौधरी, महेंदर डुलगच, राम कल्याणकर, अजमेर बिडला, संघ प्रशिक्षक शिवराम लुटे, संघ व्यवस्थापक राजेश देशमुख यांचा समावेश आहे.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघास सुभेच्छा दिल्या.