
हदगाव/हिमायतनगर। तालुक्यातील आष्टी उपकेंद्रतुन कांडली फिडर ओव्हरलोडमुळे थ्री फेज विज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे रुद्राणी फिडरवर विज पुरवठा जोडून देण्यात यावा व चार गावांचा विजेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता साहेब महावितरण कार्यालय भोकर यांच्याकडे सामाजीक कार्यकर्ता दिपक पाटील वटफळीकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगाव विभागीय महावितरण अंतर्गत आष्टी उपकेंद्रतुन कांडली फिडरवर थ्री फेज विज पुरवठा ओव्हर लोडमुळे थ्री फेज विज पुरवठा मिळत नाही. कांडली फिडर वर वटफळी,बोरगाव, कांडली(खुर्द) कांडली(बु) या गावातील सर्व शेतकऱ्यांना खरीप – रब्बीच्या हंगामात लागवड केलेल्या पिकांना सीजन मध्ये थ्री फेज विज पुरवठा एक दिवस आड करूंन मिळत असतो. दोन गावं आज दोन गावं उद्या असा वीज पुरवठा देण्यात येतो,खरीप व रब्बीच पीक पाणी उपलब्ध असून सुद्धा वीज पुरवठा दररोज मिळत नाही म्हणून पिक सुकतात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे.
फिडर ओव्हरलोड मुळें कृषी पंप धारकांना व चार गावाला त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून ग्राहकांचे म्हणणे आहे की, रुद्राणी फिडर वर काही गावे जोडून देण्यात यावे ,रुद्राणी फिडर हा स्वतंत्र रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या एच टी ग्राहकासाठी होता. परंतु सदर ग्राहक हा एक ते दीड वर्षापासून पी डी झाल्यामुळे सदर फिडर बंद आहे, आष्टी उपकेंद्रातून निघालेल्या रुद्राणी फिडर उच्चदाब वाहिनी वटफळी फाट्या पर्यंत बंद अवस्थेत आहे. त्यावर महावितरण ने आम्हाला वीज पुरवठा जोडून द्यावा व कृषी पंप धारकांना वीज ग्राहकांना या विजेच्या लपंडावातून मुक्त करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
जर महावितरण ने विज पुरवठ्याचा प्रश्न न सोडवल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करून महावितरण कंपनी विरोधात उपोषणा बसणार असल्याचेही सामाजीक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग भोकर जि नांदेड यांच्याकडे सामाजीक कार्यकर्ते दिपक बाबुराव जाधव पाटील रा. वटफळी ता. हिमायतनगर जि नांदेड यांनी सुपूर्द केले आहे.
