रक्तदान सर्व श्रेष्ठ दान.. आ. मोहनराव हंबर्डे

नवीन नांदेड l रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन अनेक गंभीर जखमी लोकांना रक्तदान मुळे जिवदान मिळाले असल्याचे सांगुन आयोजक नांदेड दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीप भागिले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या भव्य महा रक्तदान शिबीर उपक्रमाचे स्वागत करून स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन आ. मोहनराव हंबर्डे यांनी केले.
आयोजक दिलीपसिंह भागिले समन्वयक नांदेड दक्षिण विधानसभा यांच्या कडून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाभव्य रक्तदान शिबीर व अन्नदान वाटप २७ जुलै रोजी वाजता सिडको मुख्य रोडवरील श्री साई मोटर्स लातूर फाटा येथे आयोजित करण्यात आले होते, या रक्तदान शिबीराचे ऊदघाटक आ. मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम, दिलीप धोंडगे, महिला जिल्हा संघटक नांदेड वत्सलाताई पुयड, माजी ऊपमहापौर विनय पाटील गिरडे,भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे, सेवानिवृत्त उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे, पद्माकर सावंत, सिडको शहर प्रमुख जितुसिंग टाक, ऊप शहरप्रमुख नंदु वैध, माजी शहर प्रमुख साहेबराव मामीलवाड,तुकाराम पवार, निवृती जिकलंवाड, कृष्णा पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी,अवतार सिंग सोडी,वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे,गौरव दरबस्तवार,आदेश कच्छवा, धनराज भागिले,प्रेमसिंग ठाकुर, सरपंच भगवान तारू,बालाजी पाटील भायेगावकर,,तौफीक खान, सह मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक,मित्र मंडळ यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी सिडको व परिसरातील पावसाळ्यात पाऊस पासून सुरक्षित राहण्यासाठी उपस्थित पाहुण्याचे हस्ते छत्री तर रक्तदान दाते यांना प्रमाण पत्र व छत्री भेट देण्यात आली, यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाचे रवि जनकोट,नरेश चौधरी यांच्या सह अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला यावेळी उपस्थित पाहुण्याचा हस्ते भगवी शाल देऊन स्वागत करण्यात आले तर उपस्थित मान्यवराचे स्वागत आयोजक दिलीप सिंग भागिले व मित्र परिवाराने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले.
या शिबीराचे रक्तदान संकलन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील डॉ.अकिंता लोहिया डॉ.पुजा लक्षशटवार, अतुल टाकसांडे,शरद अवचार,व मदतीनीस यांनी केले,या महाभव्य रक्तदान शिबीर मध्ये शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व नागरिक यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबीर यशस्वी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक तथा नांदेड दक्षिण विधानसभा समन्वयक, व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, नांदेड दक्षिण पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
