नांदेड/कंधार। तालुक्यातील नागबर्डी येथील देवस्थानाच्या विविध विकास कामांचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात विकासाची विविध कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत . यासोबतच धार्मिक स्थळांचा आणि पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. कंधार तालुक्यातील नागबर्डी येथील प्रसिद्ध देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यापूर्वीही करोडो रुपयांचा निधी खेचून आणला.

येथे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देताना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने ही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. साडेतीन कोटी रुपयांपेक्षा ही जास्त किमतीचे विकास कामे येथे सध्या मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या कामाच्या संदर्भात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली. सर्व कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचनाही खा. चिखलीकर यांनी यावेळी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, एडवोकेट किशोर देशमुख, तहसीलदार राम बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव पाटील सावळे, प्रकाश तोटावाड, सुभाष गायकवाड, गुलाब उबाळे, सुधाकर सूर्यवंशी, केरबा पाटील वडवळे, सावळेश्वरचे सरपंच केशव कदम, नागोराव शिरसाट, मारोती सूर्यवंशी, हळदीचे सरपंच हणमंत हाळदेकर, मुकिंदा हळदीकर, सुमेध गजभारे, शिवा चक्रधर कंधारची तहसीलदार बोरगावकर पाणीपुरवठा उपयोगी कडे गुंडा येथील तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक वनाधिकारी महावितरणचे अधिकारी आदींची उपस्थिती होती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version