नांदेड| विश्व पर्यावरण दिवसानिमित्य गुरुवार दि.05 जुन रोजी नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात जेष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी 101 झाडे लावण्यात आली.

वृक्षारोपण मोहिमेत सीनियर सेक्शन इंजीनियर कपिल थोरात, स्टेशन मैनेजर आशुतोष कुमार , मुख्य वाणिज्य निरीक्षक संजीव कुमार,मुख्य स्वास्थ निरीक्षक प्रेमसिंह मीना, रेल पथ निरीक्षक संजय श्रीवास्तव, सीनियर सेक्शन इंजीनियर इलेक्ट्रिकल कुमार चंद्रहास, संतोष भारती यांच्यासह 15 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी शासकीय नियमानुसार खड्डे खोदून त्यामध्ये निम, पिपंळ,वड यासह इतर झाडे लावण्यात आली. यावेळी बोलतांना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, वृक्षारोपण हा रेल्वेचा स्तुत्य उपक्रम असून यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार आहे. झाडयांची निवड अतिशय योग्य असल्यामुळे या परिसरात प्राणवायू मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

नष्ट होत चाललेल्या पक्षांना विसावा मिळणार असल्यामुळे कपिल थोरात व रेल्वे अधिकारी व कामगारांचे करावे तितके कौतुक कमी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल थोरात यांनी तर आभार संजीव कुमार यांनी मानले. या प्रसंगी प्रत्येक वृक्षाची वैयक्तिक निगा राखण्याची शपथ सर्वांनी घेतली. अल्पोहरानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version