श्रीक्षेत्र माहूर| माहुर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गसह दत्त चौक टि पॉईंट येथे सोमवार दि 7 .7 2025रोजी वाहन तपासणी मोहीमेला सुरुवात करण्यात आली या तपासणी मोहिमेत बेसिस्त वाहन चालकांना दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून वाहनचालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व ईतर कागदपत्रे सोबत बाळगावी असे आवाहन माहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून टी पॉइंट येथे ट्राफिक सिग्नल बसवावे यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माहूर शहरासह तालुक्यात अल्पवयीन विनापरवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भाविकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी तसेच काहींनी प्राण गमवावे लागले. हि गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचा नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि 28 जुन ते 7 जुलै 2025 पासुन वाहन तपासणी मोहीमेला सुरुवात केली.या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व‌‌‌ स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.

टी पॉईंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्याने येथे ट्राफिक सिग्नल ची मागणी करण्यात येणार असून दि 7 रोजी वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना दहा हजार रुपयांचा दंड ऑनलाईन ठोठावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे या स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माहुर शहरासह तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. या मोहिमेत सपोनी पालसिंग ब्राह्मण सपोनि संजय अन्येबोईनवाड, यांचेसह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version